“माझ्या नादाला लागायचं नाय, असे 100 जण तंगड्याला बांधून फिरते ही चित्रा वाघ”
मुंबई | पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरण सध्या राज्यात वादाचं कारण ठरत आहे. कुचिक यांच्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोप केले होते. पिडीत तरूणीने आता वाघ यांच्यावरच आरोप केले आहे. परिणामी महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाघ यांना घेरण्यास सुरूवात केली आहे.
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना परत एकदा विचित्रा वाघ असं म्हटलं आहे. महिलांच्या रक्षक सांगणाऱ्या भक्षक आहेत, अशी टीका शेख यांनी केली. परिणामी आता वाघ यांनी शेख यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंं आहे.
कुचिक प्रकरण गंभीर आहे, त्यावर बलात्काऱ्यांनी बोलू नये, असं वाघ म्हणाल्या आहेत. शेखला म्हणावं तु तुझं चामडं सांभाळ, ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे. असे 100 जण तंगड्याला बांधून फिरते ही चित्रा वाघ, माझ्या नादाला लागण्याचं काम अजिबात करायचं नाही, असा इशारा वाघ यांनी शेख यांना दिला आहे.
दरम्यान, कुचिक प्रकरणात आरोप करणाऱ्या तरूणीनं वाघ यांनी जबरदस्तीनं चुकिचे आरोप केल्याचा खुलासा केल्यानंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
थोडक्यात बातम्या –
“संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर दबाव टाकून…”; प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरचे भूूमिपूजन होणार!
“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशाप्रकारचे संस्कार केलेत?”
मोदी-बायडन यांच्यात वर्च्युअल बैठक; रशिया-युक्रेन युद्धाबाबत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
“लोकांना कायद्यापासून पळू नका म्हणणारेच आता #*# पाय लावून पळतायंत”
Comments are closed.