महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?- चित्रा वाघ

मुंबई | राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गन्हा दाखल झालाय. चौकशी आणि तपासाच्या नावाखाली आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपी समोर दिसत असताना पोलीस का शांत बसले आहेत, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर कँम्पेन राबवण्यात येत आहे. पीडिते आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

राज्यात लागू करण्यात येणाऱ्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलीय का?, हा प्रश्न चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला आहे.

दरम्यान, संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो किंवा फोनवर बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो, माझे मुंबईत कार्यक्रम होते. आरोपी मी असेन तर माझी नार्को टेस्ट करावी. तसेच 14 नोव्हेंबरला गावाकडं होतो. पोलिसांना सर्व पुरावे माहिती देण्यास तयार आहे, असं मेहबूब शेख म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या-

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, इतके नगरसेवक हाती शिवबंधन बांधणार

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पुन्हा धाडले समन्स

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे; उर्मिला मातोंडकरांचा कंगणाला अप्रत्यक्ष टोला

अभ्यासावरून पालक ओरडल्याने 14 वर्षांच्या मुलाने घर सोडलं; घरातून चोरले दीड लाख

शाब्बास! अजिंक्य रहाणेने केली डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या