“मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील”
मुंबई | मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील. मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा अजूनपर्यंत विश्वास आहे, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.
मुख्यमंत्री हे अतिशय चांगले, संवेदनशील आहेत. त्यांच्याकडे बघण्याची आमची भूमिका ही वेगळी आहे. जनता त्यांच्याकडे फार चांगल्या नजरेने बघते. मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते बाकीच्या इतर मंत्र्यांसारखे नाहीत. म्हणून मुख्यमंत्री या माणसाला हाकलून देतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
शिवाजी महाराजांनी महिलेवर अत्याचार केलेल्या पाटलाचे हातपाय तोडले होते. त्याचबरोबर महाराजांनी सुभेदाराच्या सूनेची मानसन्मानाने पाठवण केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी या दोन घटना डोळ्यांसमोर आणाव्यात. म्हणजे या संजय राठोड सारख्या नराधमाचा राजीनामा घेणं तुम्हाला नक्कीच सुलभ होईल, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
संजय राठोड या माणसाबद्दल बोलून आपण आपलं तोंड का खराब करून घ्यायचं. इतका संतापजनक हा प्रकार आहे. एमुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना माफी देऊ नये. त्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, …तर पेट्रोल-डिझेलची किंमत निम्म्या होतील?
संजय राठोडांचा पाय खोलात, पूजाला दिलेल्या गिफ्टबॉक्सचे ‘हे’ धक्कादायक फोटो व्हायरल
त्यांनी गर्दी जमवली नाही, शिवसेनेच्या मंत्र्याला शिवसेनेच्याच मंत्र्याकडून क्लीनचिट!
आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी!
महाविकास आघाडीला मोठा धक्का, ‘या’ पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी?
Comments are closed.