मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनी एक व्हीडिओ ट्विट करुन संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पूजा चव्हाणच्या हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्यात.
दरम्यान, मूळची परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि त्याच्या एका मित्रासोबत महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीमध्ये राहात होती. याच सोसायटीत तीने आत्महत्येचं पाऊल उचललं.
पूजाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. महाविकास आघाडी सरकारधील एका बड्या मंत्र्यासोबत तीचे प्रेमसंबंध होते आणि याच संबंधातून तीने आत्महत्या केल्याची चर्चा होती. भाजपने देखील हा मुद्दा उचलून धरला असून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“जनतेने मोदी सरकारला देश विकायला सत्तेवर आणलं नव्हतं”
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची फडणवीसांनी गंभीर दखल घेत ‘त्या’ ऑडिओ क्लिप डीजींकडे पाठवल्या
इक्बाल मिर्ची प्रकरणात या नेत्याला ईडीकडून समन्स!
‘माझी बहिण वाघिण होती पण…’; पूजा चव्हाणच्या बहिणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल!
प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, अन् तुम्ही मला…- अजित पवार