महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री महोदय, सर्व पुरावे असतांना वाट कसली पाहताय- चित्रा वाघ

मुंबई | परळीची असलेल्या पुजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. पुजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणात सर्व पुरावे असताना मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय?, असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

पूजा चव्हाणच्या परीवारावर दबाव असू शकेल. पोलिस अशा केसेस सुमोटो दाखल करून घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नकोचं. अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

गृहमंत्री जी सध्या राज्यातील महिला अत्याचाराबाबत संजयची म्हणजेच जे जे दिसेल ते ते पहावे ते साथी सत्ताधार्यांना कथन करत क्लीनचीट देत पुढे चालावे च्या भुमिकेत दिसताहेत पूजा चव्हाण केसमध्ये मोबाईलच मोठा पुरावा आहे. ज्यात तिला जीवन संपवण्यास परावृत्त करण्यापासून तर मृत्यू झाल्यानंतर कसही करून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना कथित मंत्र्याकडून दिल्याचं रेकॉर्डिंग सगळ्यांनी ऐकलं. अजूनही याबद्दल पोलिस काहीही स्पष्टता देत नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

 

 

थोडक्यात बातम्या-

“राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहीजे, एका हाताने टाळी वाजत नाही”

देवेंद्र फडणवीसांच्या ‘निवडून येणार’ला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केेलेली ‘ती’ चूक तुम्ही करू नका- कंगणा राणावत

‘माझी पक्षात घुसमट होतीये’; ‘या’ खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा

“पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारीपासून याचचं हं, पण खबरदार जर…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या