बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘PI लगडला चालवणारा बाप कोण ते आम्ही शोधून काढू’; चित्रा वाघ आक्रमक

पुणे | भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीची पाहणी केली. पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली.

आम्ही मुंबईतून पूजा चव्हाण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. मात्र, आज प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर तपासाची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आलं, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी पुणे पोलिसांवर निशाणा साधला.

वानवडी पोलिसांना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण रफादफा करायेच आहे. त्यासाठीच हे प्रकरण PI दीपक लगड याच्यासारख्या रगेल अधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी दीपक लगड यांच्याकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी केली आहे.

वानवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक लगट यांना हे प्रकरण रफादफा करण्यासाठीच बसवले आहे. मी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी अत्यंत मग्रुरीने उत्तरे दिली. आपला कोणीतरी बाप वरती बसलाय, कोणी काही बोलले नाही तरी तू काही करायचे नाही, आम्ही काय ते बघतो, अशा एकंदर आविर्भावात PI लगड दिसतात. या लगडला चालवणारा बाप कोण आहे, हे भाजप नक्की शोधून काढेल, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या इमारतीची चित्रा वाघ यांनी केली पाहणी!

अभिनेत्री निया शर्माचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

‘होय, आम्हीच कोरोना पसरवला’; अखेर तबलिगींनी दिली कबुली

पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!

तरूणाने गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More