बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रातील लेकीबाळींचे लचके तोडले जातायेत, सरकारला लाज वाटली पाहिजे”

मुंबई | साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झंज अपयशी ठरली. पीडितेचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या पीडित महिलेच्या कुटुंबियांंची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्रातील लेकीबाळींचे लचके तोडले जात आहेत. त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. सरकारला याची लाज वाटली पाहिजे. सरकारने महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असं म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महिलेला ज्या प्रकारे मारण्यात आलं आहे हे ते पाहता हे एका माणसाचं काम असेल असं वाटत नाही. तिने सगळं कसं सहन केलं असेल याची कल्पना देखील करवत नाही. मात्र सरकार घोषणा आणि भाषणांपलीकडे काहीच करू शकत नाही. राज्य सरकारसाठी ही घटना म्हणजे केवळ एका गुन्ह्याची नोंद यापलीकडे काही नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केलीये.

गुन्हे दाखल झाले तरी महिलांवर अत्याचार करणारे लोक राजरोसपणे बाहेर फिरत आहेत. त्यामुळे विकृतांचे मनोबल वाढत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे कधीही निघाले नव्हते, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

‘लस घेतली नाही तर…’; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्वाची बातमी!

“आम्ही इंचभरही सरकार हलू देणार नाही, याची विरोधकांनाही मनोमन खात्री पटली”

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी!

मुंबई बलात्काराच्या घटनेनं हादरली, अत्यंत अमानुष घटना उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More