बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी शरद पवारांच्या तालमीत तयार झाले, त्यामुळे…- चित्रा वाघ

मुंबई | मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला तर ते संजय राठोडला पाठिशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीची पाहणी केली. पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या.

संजय राठोड हे राज्यभरात फिरतात. मात्र पोलिसांना ते दिसत नाहीत. संजय राठोड हे पाच-साडेपाच फुटांचे असतीलच. ते पोलिसांना न दिसायला काय मिस्टर इंडिया आहेत का, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप अपेक्षेने बघत आहोत. तुमची छबी तशीच राहू द्या, आम्हाला महाविकासआघाडी सरकारमधील इतर कोणत्या मंत्र्याकडून अपेक्षा नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या-

“मी मर्द आहे हे उद्धव ठाकरेंनी परत कधीही म्हणू नये”

संजय राठोडांसाठी जमलेल्या गर्दीत कोरोना; महंत कबीरदास यांच्यासह 19 जण पाॅझिटिव्ह

‘कोरोनापासून बचावासाठी मी रोज…’; ‘या’ भाजप नेत्याचं अजब वक्तव्य

मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत- संजय राऊत

…म्हणून हृतिक रोशनने 75 कोटींची ती ऑफर धुडकावली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More