औरंगाबाद महाराष्ट्र

“राष्ट्रवादी जळगावमध्ये इतक्या जागा लढवणार”

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा लढवणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महिला आघाडीची बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना पक्ष बळकट करण्याचं आवाहन केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असल्याचंही वाघ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जळगाव शहर, यावल आणि रावेर हे तीन मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आले आहेत, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“आघाडीच्या नेत्यांच्या घरी आम्ही भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण घेऊन गेलो नाही”

-नवी मुंबईकरांसाठी महापालिकेडून मोठी खुशखबर

-मुंबईतील सर्व जागा युतीच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

-वडिलांचं छत्र हरपलेल्या शेतकरीकन्येचा शिक्षणखर्च रोहित पवारांनी उचलला

-पॉर्न बघत असाल तर सावधान; समोर आलीय अत्यंत धक्कादायक माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या