बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार”

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील शाब्दिक युद्ध चालू आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मीही शरद पवारांच्या तालमीत तयार झाली आहे ते शिवसेनेचे नेेते संजय राठोड यांना पाठीशी घालणार नाहीत, असं म्हटलं होतं. यावरून अमोल मिटकरांनी वाघ यांच्यावर टीका केली होती. अशातच अमोल मिटकरींनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“वाघाची” डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळी सुद्धा हवेत कशी विरून जाते हे ही आज प्रत्यक्ष अनुभवलं. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं होतं. यावर टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती?, तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही,  असं चित्रा वाघ म्हणाल्या.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी काय प्रत्युत्तर देताता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव

13 महिन्यांच्या तुरुंगवासादरम्यान कैद्याने केलं ‘हे’ कौतुकास्पद काम!

इंधन दरवाढीवरून रोहीत पवारांनी मोदींना दिला ‘हा’ सल्ला

“…हे बेणं म्हणजे 2029 चा आमदारच म्हणा ना”

धक्कादायक! मुंबईच्या रस्त्यावर कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण फिरतांना आढळले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More