Top News महाराष्ट्र मुंबई

“करुणा आणि रेणू शर्मा दोघीही एकाच घरात राहतात, मग मोठी बहीण का बोलत नाही?”

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी आपण 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. तसेच आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा मोठा खुलासा केला होता. मात्र यामुळे मुंडे अडचणीत सापडले आहेत.

तक्रार करणारी महिला आणि धनंजय मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते संबंधात असलेली महिला दोघीही एकाच घरात रहातात मात्र मोठी बहीण यावर काहीच बोलत नाही. तिची मोठी बहीण याप्रकरणी का बोलत नाही?, असा सवाल भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याची शक्यता आहे. शरद पवारांनीही यावर सूचक असं वक्तव्य केलं आहे. पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मी राजीनामा दिलेला नाही आणि मला पक्षानेही राजीनामा मागितला नसल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आज त्यांनी मुंडेंना टार्गेट केलं, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो- कृष्णा हेगड

धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्ही तक्रार का देताय?, हेगडे म्हणाले…

“धनंजय मुंडेंवर माझा विश्वास ते स्वत:च राजीनामा देतील”

“माहिती लपविणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या