Top News मुंबई

“सर्व सामान्यांवर जोर दाखवण्यापेक्षा त्या हरामखोरांवर तुमचा जोर दाखवा”

मुंबई |  गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील एका तरुणाने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. आव्हाड यांच्यासमोर त्यांच्याच बंगल्यावर नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणानं केला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

अरे बाप रे अमानवीय ,सर्व सामान्यांवर जोर दाखवण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये उपचार देणार्या नर्सेस समोर विकृत अश्लील चाळे करणार्या हरामखोरांवर तुमचा जोर दाखवा, असं चित्रा वाघ यांंनी म्हटलं आहे.

संबंधीतांवर कारवाई व्हावी, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी गृंहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाणे पोलिस यांना ट‌ॅग केलं आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी आपल्याला रुग्णालयात दाखल केलं, असं या तरुणानं म्हटलंय. रुग्णालयातून सुटल्यानंतर वर्तकनगर पोलीस स्टेशन गाठत या तरुणानं यासंदर्भात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

बंगल्यावर नेऊन 15-20 जणांकडून जबर मारहाण; तरुणाचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप

कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ चार महत्त्वाचे निर्णय

महत्वाच्या बातम्या-

“मुर्खांसोबत सरकार चालवता चालवता अजित पवारांना लोक पण मूर्ख वाटायला लागलेत?”

‘कोरोना’शी लढणाऱ्या ‘देवदुता’चं कर्तव्याला प्राधान्य; आईला ‘व्हिडीओ कॉल’मधून अखेरचा निरोप

ट्रम्प यांची भारताला धमकी; राहुल गांधींचं सणसणीत प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या