बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मग आपले पोलीस सरकारने 100 कोटी मोजायला बसवलेत का?”

मुंबई | भारतात अनेक राज्यांमध्ये मोठ्या हल्याचा कट रचणाऱ्या 6 संशयित दहशतवाद्यांना दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबईमधून अटक केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन कारवाई केल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दिल्ली पोलीस मुंबईत येऊन दहशतवाद्यांना अटक करतात, मग आपली फौज काय 100 कोटी मोजण्यासाठी ठेवली आहे का?, असा सवाल चित्र वाघ यांनी केला आहे. अटक करण्यात आलेले 6 दहशतवादी प्रयागराजमधील करेल भागात लपले होते. मात्र वेळीच स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने त्यांच्या मुसक्या आवळल्या.

अटक करण्यात आलेल्या 6 दहशतवाद्यांमधील 2 जणांना पाकिस्तानमधील थट्टा टेरर कॅम्पमधून ट्रेनिंग देण्यात आलं होती. यादरम्यान त्यांना 15 दिवसांची ट्रेनिंग देण्यात आली होती. यामधे त्यांना फिदाई हल्ला, लोकांना बंदी आणि एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कसा हल्ला करायचा अशा अनेक गोष्टी शिकवण्यात आल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, चौकशीवेळी 6 मधील एक दहशतवाद्यांमधील एक  मुंबईमध्ये वास्तव करत असल्याची माहिती समोर आली. तसेच प्राथमिक तपासातून देशभरातील अनेक राज्यांमध्ये अधिक दहशतवादी वास्तव करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच या घटनेनंतर सर्व तपास यंत्रणांना हाय अलर्ट करण्यात आलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

विदर्भातील काँग्रेस मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार- किरीट सोमय्या; सोमय्यांच्या रडारवर आता कोण?

जनता भोळी जरूर आहे पण मुर्ख नाही – चंद्रकांत पाटील

आरसीबीचा ‘वाघ’ एबी डिव्हिलियर्सचं वादळी शतक, गोलंदाजांना भरणार धडकी, पाहा व्हिडीओ

महात्मा गांधींना RSSच्या विचारसरणीने का गोळ्या घातल्या?- राहुल गांधी

राजु शेट्टींची एक हाक, तीन दिवसात आले मिस्डकॉल सव्वादोन लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More