Top News महाराष्ट्र मुंबई

मेहबूब शेख प्रकरणात मला पोलिसांची बाजू संशयास्पद वाटते- चित्रा वाघ

मुंबई | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब झाल्याचं समजत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला प्रदेशाध्य चित्रा वाघ यांनी सणसणाटी आरोप केले आहेत.

पोलीस तपासाच्या नावाखाली आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. यासंदर्भात त्यानी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

पोलीस जरी आरोपीला वाचवत असले तरी आम्ही पीडितेच्या पाठीमागे आहोत. पीडितेने घाबरण्याचं कारण नाही. झालेल्या कृत्याबद्दल आरोपीला शिक्षा मिळायलाच हवी, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपीबाबत कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे साहजिकच आहे की पीडितेवर दबाब पडणार आणि ती पीडित आज गायब आहे. मला तिला सांगायचंय की आम्ही तुझ्यासोबत आहोत, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

 

थोडक्यात बातम्या- 

शिवसेना ही नाटक कंपनी आहे- देवेंद्र फडणवीस

‘तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकेल ; भाजप खासदाराला विश्वास

‘महिलांना फक्त सन्मान आणि प्रेमाची गरज तुमच्या पगाराची नाही’; कंगणाचा शशी थरूर यांच्यावर निशाणा

धक्कादायक! शीर कापलेल्या नग्न अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

‘शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना’; भाजपचा सेनेवर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या