बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्यावर दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार- चित्रा वाघ

मुंबई | भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी गुन्हा दाखल केला आहे. चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरूरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत शेख यांनी वाघ यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अशातच यावर चित्रा वाघ यांनी मेहबुब शेख यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आज मी चिपळूणला आहे. मला बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की शिरूरकासार येथे मेहबूब शेख यांच्या तक्रारीवरून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिला अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा पण मी बोलत राहणार, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

शेख यांनी आपल्या तक्रारीमध्ये, 18 जुलै 2020 रोजी बीडमधील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी एकनाथ पवार यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यावेळी बीडचे भाजप अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चित्रा वाघ यांनी, मी एका मुलीवर बलात्कार केला असं सांगत आणि राज्य सरकार शेख यांना अटक करत नाही, असं मेहबुब शेख यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, वास्तविक पाहता पोलिसांनी तो गुन्हा निकाली काढला आहे. मात्र तरीही माझी बदनामी व्हावी या उद्देशाने नको ते आरोप केले आणि बदनामीचा प्रयत्न केला आहे, असंही शेख यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“जोपर्यंत कोरोना कमी होणार नाही तोपर्यंत साहित्य संमेलन नाही”

भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 11 वर्षांची नताशा ठरली जगातील सर्वात हुशार विद्यार्थिनी

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी

… अन्यथा आंदोलन करण्यात येईल, एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक!

माझ्या व्यवसायावर लाथ मारू नकोस- गुलशन ग्रोवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More