बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ओ लंके, 2 पावलं मागे नाही तर, 200 पावलं पुढे जात ठोकणार”

अहमदनगर | मागील काही दिवसांपुर्वी एका ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप पारनेच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला होता. यावर बोलताना लंके म्हणाले होते की, देवरे यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी मला आत्महत्या करणार असल्याचे मेसेज केले होते. मात्र अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देवरे यांची भेट लंकेंवर निशाणा साधला आहे.

ओ लंके ते आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. दोन पावले माघार घेतं नाही, तर 200 पाऊलं पुढे जात ठोकणार आहे, हे ध्यानात ठेवा. आम्ही सगळे ज्योतीताई देवरेंच्या मागे सक्षमतेने उभे आहोत, असं म्हणत चित्रा वाघ यांनी निलेश लंकेंना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. यावरूनही चित्रा वाघ यांनी आरोपही केली आहे.

कमाल आहे, निलेश लंके यांनी आमचे नेते देवेंद्र यांच्यासोबत फोटो काढून लगेच भाजपची दोन पावले माघारची बातमी छापून आणली, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. वाघ यांनी एक ट्विट केलं आहे.

दरम्यान,  चित्रा वाघ यांनी पारनेरच्या दंडाधिकारी कार्यालयात जाऊन ज्योती देवरे यांची भेट घेतली. त्यावेळी, रडायचं नाही तर थेट भिडायचं, आपण ही लढाई लढू आणि जिंकूही, आम्ही तुमच्या सोबत आहेत, असं म्हणत देवरे यांना जाहीर पाठींबा दर्शवला.

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“मी जर गॅंगस्टर होतो तर शिवसेनेने मला मुख्यमंत्री का केलं होतं”

‘काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा…’; मुख्यमंत्र्यांची नाव न घेता राणेंवर टीका

काय सांगता! पुणे मेट्रोतून चक्क सायकल घेऊन प्रवास करण्याची मुभा

“भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कोणताही नेता घाबरत नाही”

चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही, तुम्हाला ते पटलं असेल तर…- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More