बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एकट्या महिलेवरती हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का?’; चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल

मुंबई | तुम्ही वसुली सरकारच्या कार्यकाळात सचिन वझे सारख्यांना तिथे जागा देऊन, या वास्तूला ‘वसूली भवन’ म्हणून ख्याती प्राप्त करून दिली, असं म्हणत भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

एकट्या महिलेवरती हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का?, हेच तुमचे संस्कार का?, बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: अशा नेभळट प्रकाराला चोप दिला असता. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवनाला जी अस्मिता आणि गरिमा मिळवून दिली असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने जमीन खरेदी करताना घोटाळ्याच्या वादावरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.

आपल्यात हिंमत असेल तर आपण सामनात अग्रलेख लिहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वक्फ बोर्डाच्या जमिनी घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिकरित्या खुलासा मागावा. अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे, हे कबूल करावं, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, राम मंदिराबाबत जर आपल्या काही शंका होत्या तर आपण स्वत: समितीला संपर्क करून त्या दूर करू शकला असता. पण असं न करता आपण मुद्दामहून सार्वजनिकरित्या या अफवांना आपल्या लेखनीद्वारे समर्थन दिलं आहे. यावरून आपली हिंदू विरोधी निती आणि सत्तेसाठी लाळघोटेपणा दिसून येत असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा आरोप

“भाजप आंदोलन करायला आजही घाबरलं नाही, उद्याही घाबरणार नाही”

‘करीनाला ‘सीते’ची भूमिका करु देणार नाही’, करीना कपूरला धमकी

“राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार”

जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णा हजारेंचं रोखठोक उत्तर; म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More