बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…मग संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली’; चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजुर करण्यात आला होता. यावरून ठाकरे सरकारमधील नेत्यांनी भाजपवर टीका केली होती. शिवसेना नेते संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

ईडी किंवा सीबीआयशी आमचं काही वैयक्तिक वैर नाही. त्या राष्ट्रीय संस्था आहेत. देशाचं नुकसान होणारी घटना असेल म्हणजे  मनी लाँड्रिंगसारखी तर सीबीआय चौकशी व्हायला हवी. मात्र सध्या त्यांच्याकडे ज्या प्रकारची प्रकरण जात आहेत ती राजकीय वाटत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर राऊतांवर चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

भाजपच्या बैठकीत काही लोकांच्या सीबीआय चौकशी करा अशी मागणी करण्यात आली. मला हेच कळत नाही की संजय राऊतांच्या छातीत का कळ आली?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यासोबतच पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे जेलमध्ये बसून त्याच्या पापाच्या भागीदारांची नावं घेतोय, कारवाई तर होणार असंही वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपच्या कार्यकारिणीमध्ये ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, बारा बलुतेदारांना पॅकेज, शेतकऱ्यांना हक्काचे पीकविम्याचे पैसे अशा मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यावर संजय राऊतांनी भाष्य करावं. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी या प्रश्नांवर महाविकासआघाडीला जाब विचारायला पाहिजे आणि त्यांच्या शौर्याचा पुन्हा एकदा परिचय महाराष्ट्राच्या जनतेला करून द्यायला पाहिजे, असं आव्हान चित्रा वाघ यांनी राऊतांना केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘मी फार वर्ष असले उद्योग केलेत’; बिगर भाजप आघाडीबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

‘परमबीर आयुक्त पदावर होते त्यावेळी…’; ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

“सुप्रियाताईंची धडपड केविलवाणी, लोकसभा निवडणुका नसल्याने ताई पुण्यात जास्त नसतात”

“कोरोनाची तिसरी लाट आल्यास इतक्या लाख जणांना संसर्ग होण्याची शक्यता”

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराची आजची आकडेवारी दिलासदायक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More