Top News महाराष्ट्र मुंबई

‘…हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा’; गजानन मारणेनेेने काढलेल्या मिरवणुकीवरून चित्रा वाघ आक्रमक

Photo Credit- facebook | Gajanan Marane & Twitter | Chitra Wagh

मुंबई | कुख्यात गुंड गजानान मारणे झेलमधून सुटका झाल्यानंतर त्याच्या टोळीने काढलेल्या जंगी मिरवणुकीने सर्वांनाच धक्का बसला होता. एक्सप्रेसवेवरून गजानन मारणे मुंबईहून पुण्याला येताना त्याच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी मोठ्या प्रमाणात चारचाकी गाड्यांचा रोड शो केला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्यात रोज खून हल्ले बलात्काराच्या घटना तर घडतातच पण तुरुंगातून सुटका झाल्यावर एखादा नामचीन गुंड मिरवणूक काढायची हिंमत करतो. कोणीही गुंड खुलेआम दणक्यात वाढदिवस साजरे करायची हिंमत करतो. हे चांगल्या समाजासाठी लाजीरवाणं आहेच पण हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचाही पुरावा असल्याचं म्हणच चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

गजानन मारणे तळोजा कारागृहातून बाहेर आला. त्यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने त्याचे समर्थक मारणेची वाट बघत होते. मारणे बाहेर आल्यावर मारणे टोळीतील मुलांनी आणि त्याच्या चाहत्यांनी एक्सप्रेस हायवेवरुन चित्रपटाप्रमाणे त्याची मिरवणुक काढली. मुंबईहून पुण्याकडे येताना या गाड्यांचा एकामागोमाग एक ताफाच निघालेला दिसला.

दरम्यान, मारणे टोळीने गजानन मारणेच्या केलेल्या जंगी मिरवणुकीमुळे त्याच्या विरोधात कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यावरून गजानान मारणेला पुन्हा अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे गेल्या महिन्यात शरद मोहोळ तुरुंगातून बाहेर आला असून इतरही काही गुंड सध्या बाहेर आले आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा टोळीमध्ये वर्चस्व वादावरून टोळीयुद्ध रंगतं की काय अशा चर्चांणा उधाण आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

तहानलेल्या सापाला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, पाहा व्हिडिओ

फास्ट-टॅगवरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरेंचा टोल नाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल!

…म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं- आशिष शेलार

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार असाल तर सावधान!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या