रायगड | महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना पेणमध्ये घडली आहे. अवघ्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीतही दिसू द्या, असं आवाहन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं सत्र हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या प्रकरणातील आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी जेलमध्ये शिक्षा भोगत होता. कोरोना काळात मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती, की त्यांना न्यायालयाला विनंती करावी, की महिलासंबंधी गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या आरोपींना कोरोना काळात जामीन किंवा पॅरोलवर सोडण्यात येऊ नये, असंही वाघ यांनी सांगितलं.
दरम्यान, आमच्या मागणीची विचार न झाल्यामुळे संबंधित आरोपीने जेलबाहेर आल्यानंतर पुन्हा असं दुष्कृत्य केलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नसल्याचं म्हणत वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली.
पेणमधील चिमुरडीवरील बलात्कार व हत्येची घटना अतीव वेदनादायी आहे
राज्यात आज ६०वर्षीय आजीपासून तर अडीच वर्षीय चिमुरडीपर्यंत कुणीही सुरक्षित नाही
मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीत ही दिसू द्या @CMOMaharashtra pic.twitter.com/1ztdyrBVE1— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 31, 2020
थोडक्यात बातम्या-
बनावट कागदपत्र, आधार कार्ड, बनवत योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला झाली सरपंच
“गौरी तू ज्यामुळे हा निर्णय घेतला त्यांना नक्की शिक्षा मिळणार; कुणी रक्ताचं असलं तरी”
“काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवी सारखं पोखरतोय”
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध- बाळासाहेब थोरात
जिओने आपल्या ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट; फुकट वापरा ‘ही’ सेवा!