बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय, आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं; चाराछावणीतलं भीषण वास्तव

सोलापुर |  जनावरांच्या जीववार आम्ही जगतोय… आता प्रश्न आहे त्यांना कसं जगवावं?? असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांपुढे पडला आहे. महाराष्ट्र सध्या भीषण दुष्काळाला सामोरे जातोय. याच भावना सांगोल्यातील चाराछावणीतील मनिषा खुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सांगोल्यातील चारा छावणीची पाहणी केली. यावेळी मनिषा खुळे यांनी सरकारकडे काही माफक अपेक्षा व्यक्त केल्या.

आमच्या जनावरांचं दुध कमी येतंय, आम्हाला पेंड वाढवून मिळावी… छावणीवाले तरी कुठून देणार… सरकारनेच मदत करावी, अशी अपेक्षा मनिषा खुळे यांनी व्यक्त केली आहे.

या भागात रोजगाराची वाणवा आहे. सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा, असंही त्या म्हणाल्या. एकूणच काय तर राज्यात दुष्काळाची भयावह स्थिती आहे. सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

महत्वाच्या बातम्या

-राष्ट्रगीताचा सन्मान करणारे दीदींना घुसखोर वाटतात; PM मोदींचा CM ममतांना टोला

-23 तारखेला NDA ला संपूर्ण बहुमत मिळेल; मोदी पुन्हा पंतप्रधान होतील- बाबा रामदेव

काँग्रेसला पंतप्रधानपद नाही दिलं तरी चालेल; भाजपला सत्तेपासून रोखणे हाच मुख्य उद्देश- काँग्रेस

-माझी बायको कधीही खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धूंचा पत्नीला पाठिंबा

-…बरं झालं भाजप मला देशभक्त मानत नाही- कन्हैया कुमार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More