बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या इमारतीची चित्रा वाघ यांनी केली पाहणी!

पुणे | भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीची पाहणी केली. पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची माहिती घेतली. चित्रा वाघ यांनी इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.

वानवडी पोलीसांना आदेश न आल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावेळी बोलताना केला आहे. चित्रा वाघ 1 वाजता पुणे पोलीस आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील. त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील. मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास चित्रा वाघ यांनी याआधी व्यक्त केला आहे.

राज्यातील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही चांगली आहे. महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे अतिशय संवदेनशील व्यक्तीमत्व म्हणून बघते. त्यामुळे ते राठोडांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

‘होय, आम्हीच कोरोना पसरवला’; अखेर तबलिगींनी दिली कबुली

पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!

तरूणाने गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

कोरोना लसीकरणाबाबत प्रकाश जावडेकरांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

भेटीसाठी थांबलेल्या संजय राठोडांना मुख्यमंत्र्यांनी दिला अवघ्या 2 मिनिटांचा वेळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More