बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाघ डरकाळी फोडू शकतो हे त्यांनी दाखवून द्यावं”

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेचा मोठा गोंधळ उडाला होता. आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षा दोन वेळेस रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही परीक्षेत सावळा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. यावरून विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला होता. आरोग्य विभाग परीक्षवरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे.

चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राज्यातील विद्यार्थांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पोहोचवा, कारण ते तुमच्याशिवाय कोणाचही ऐकत नाहीत. सरकारच्या भोंगळ कारभाराने विद्यार्थांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे, असं चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने मी आरोग्य विभागाच्या परिक्षेतील गोंधळ मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला होता, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. वाघ डरकाळी फोडू शकतो हे त्यांनी दाखवून द्यावं. राज्यातील जनतेचे असंख्य विद्यार्थांचे पालक आहेत. हा विसर त्यांना कसा काय पडू शकतो. न्यासा एजन्सीची चौकशी का लावली नाही? एजन्सीला का ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं नाही ? असे प्रश्न चित्रा वाघ यांनी पत्रात उपस्थित केले आहेत.

दरम्यान, एमपीएससी सारखी विश्वासार्ह संस्था असताना न्यासा एजन्सीचं का निवडली? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावी, असंही चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटलं आहे. खरंतर चारवेळा ठेस लागूनही पुन्हा पाचव्यांदा परीक्षा घेण्याची जबाबदारी त्याचं एजन्सीकडे का दिली जाऊ शकते?  यामध्ये तिन्ही पक्षाचं काहीतरी साटलोटं झालं आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

अभिनेत्री दिव्या भारती यांच्या वडिलांचे निधन; साजिद नाडियाडवालाने दिली अखेरपर्यंत साथ

‘शेतकऱ्यांची काळी दिवाळी करणार असाल तर…’; सदाभाऊ खोतांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

‘सिर्फ घर नहीं, यहां तो पुरी सरकारही…’; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

‘भारतात कधी मुस्लीम व्होट बँक नव्हतीच, फक्त…’; असदुद्दीन औवेसींचं खळबळजनक वक्तव्य

‘राज्यकर्ते काय लायकीचे आहेत हे…’; राजू शेट्टींची जहरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More