“रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांची भेट घेणार”
पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विविध पक्षातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. रूपाली चाकणकरांच्या एकेकाळच्या सहकारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे.
रूपाली चाकणकरांचा राजीनामा का घेतला गेला याबाबत आपण शरद पवारांची भेट घेणार असल्याचं वक्तव्य वाघ यांनी केलं आहे. चाकणकरांच्या राजीनाम्यावर एक महिला म्हणून फार वाईट वाटतं, असं भावनिक वक्तव्य वाघ यांनी केलं आहे.
एक व्यक्ती एक पद असं धोरण असेल तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा देखील राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील वाघ यांनी केली आहे. चाकणकरांच्या राजीनाम्यामागचं कारण शोधलं पाहीजे. आमच्या पक्षात देखील एका व्यक्तीकडं दोन पदं होती, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेवून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. रघुनाथ कुचिक प्रकरणाचा उल्लेख वाघ यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या –
“तेच मूर्ख, तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते”
‘ये डर होना जरूरी है’, चंद्रकांत पाटलांचा आव्हाडांना खोचक टोला
“मुंबईचा विचार फक्त सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला”
काही दिवस ‘या’ जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा गंभीर इशारा
ईडीच्या सततच्या कारवाईवर संजय राऊत म्हणतात…”मला तर भिती वाटतेय”
Comments are closed.