Badlapur Crime | बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरमध्ये नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आता बदलापूर घटनेवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Badlapur Crime) यांनी घटनेचा निषेध करत गंभीर आरोप केला आहे.
चित्रा वाघ यांचा खळबळजनक आरोप
बदलापूरमध्ये काल जनतेचा उद्रेक बघितला. स्थानिक आमदार किसन कथोरे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या प्रक्रियेत होते. गिरीश महाजन तिथे आलेले. केसरकर आले. बरेच लोक मुंबईहून आंदोलन करण्यासाठी आले. ज्या पद्धतीने याला वेगळं स्वरुप दिलं गेलं त्याच दु:ख आहे, असं चित्रा वाघ (Badlapur Crime) यांनी म्हटलं.
आंदोलनकर्त्यांच्या हातात लाडकी बहिण योजना रद्द करा, असे बॅनर होते. सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्या सर्व केल्या. मग लाडकी बहिण योजना नको हे बॅनर का लागले. सकाळी 10 वाजेपर्यंत आंदोलन झाले, त्यामध्ये सगळे बदलापूरकर होते. पण 10 नंतर कोण लोक आले? कुठून आले?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
झालेली गोष्ट अतिशय वाईट, मनाला वेदना देणारी आहे. ज्या वेळी मुलीच्या आईला ही घटना समजली, ती पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये आली. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिली प्रोसेस म्हणजे मेडीकल. त्यामुळे मेडीकलला तीन चार तास गेले. ही पॉक्सोची केस आहे. चार-साडेचार वर्षाच्या मुलीला ज्यांना आपल्या शरीराची ओळख नाही. त्यांना बोलत करणं हे पोलिसांचं स्कील असतं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
Badlapur Crime | सरकारने आवश्यक ते सर्व केलं- चित्रा वाघ
सरकार म्हणून एसआयटीची स्थापना केली गेली. उज्वल निकम यांच्यासारखे वकील या केसला देण्यात आले. सरकार म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाठी जी जी पावलं उचलण आवश्यक आहे, ते ते सर्व सरकारने केलं, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
युवराज सिंगच आयुष्य उलगडणार मोठ्या पडद्यावर; कोणता अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका?
राज्यात पुन्हा पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
हुंदाई कंपनी टाटा सफारीला देणार टक्कर; होणार भन्नाट कार लाँच
पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याला ईडीकडून अटक; घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड
फडणवीसांना मोठा धक्का; दोन बडे नेते शरद पवार गटाच्या मार्गावर?