सरकार आवडत नसेल तर आमच्या रस्त्यांवरुन चालू नका!

अमरावती | आमचे सरकार आवडत नसेल तर निवृत्तीवेतन घेऊ नका, तसेच आमच्या रस्त्यांवरुन चालू नका, असं धक्कादायक विधान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलंय.

कुर्नुल जिल्ह्यातील नांद्याल येथे तेलुगु देसम पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपली केलेली कामं घेऊन मतं मागायला जावी, तसेच मत न देणाऱ्यांना आम्ही एवढी कामं करुनही मत का देत नाहीत असा जाब विचारावा, असंही चंद्राबाबू म्हणाले. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या