युतीसाठी शिवसेनेला हात जोडून विनंती करत आहे- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | युतीसाठी शिवसेनेसोबत फक्त संवादच सुरु नाही तर त्यांना हात जोडून विनंती केली जात आहे, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते झी 24 तास या वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

काँग्रेसनं हाताच्या आणि राष्ट्रवादीनं बंद पडलेल्या घड्याळाच्या चिन्हावर लढून दाखवावं. आम्हीसुद्धा शिवसेनेला सोबत न घेता लढू, असं आव्हान देखील त्यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीला दिलं. 

दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. केंद्र आणि राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांना मदत देण्यासाठी पावलं उचलत आहे, असं ते यावेळी म्हणाले. 

दरम्यान, दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या उभारल्या जाऊ नये, असं माझं वैयक्तीक मत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-बाळा… त्यांना खायला घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत!

-मेनका गांधींच्या भावना मी समजू शकतो- मुख्यमंत्री

-…नाहीतर त्या नक्षलवादाचे नेतृत्व मी करेन- उदयनराजे भोसले

-काँग्रेसच्या महिला सचिवांना गँगरेपची धमकी; भाजप नेत्यांवर आरोप

-काय चौकशी करायची ती करा; अजित पवारांचं दानवेंना प्रत्युत्तर

-पंतप्रधान नरेंद्र मोदींंची यंदाची दिवाळी केदारनाथला