बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘रडीचा डाव खेळू नका, आता… ‘; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान

पुणे | नागपूर विधान परिषद जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. भाजपच्या या घवघवीत यशानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीला खुलं आव्हान दिलं आहे.

‘काँग्रेसने (Congress) तर निवडणुकीचा पोरखेळ केला होता. आम्ही बिनविरोध करा म्हणत होतो. त्यांनी नागपूरमध्येही बाहेरून माणुस आणला आणि बाहेरून आणलेला तो माणूस त्यालाही फसवलं’, असा घणाघात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.

‘आता कायद्यात बदल करून रडीचा डाव खेळू नका. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवा, आता महाविकास आघाडीला माझं खुलं चॅलेंज आहे’, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आव्हान दिलं आहे.

दरम्यान, ‘आम्ही महाविकास आघाडीची मतं फोडली. तीन टर्म आमदार असलेल्या बाजोरियांना हरवून खंडेलवाल मोठ्या फरकाने विजयी झाले. तर बावनकुळेंच्या बाबतीत साई बाबांचं वाक्य खरं ठरलं व श्रद्धा आणि सबुरीचं फळ मिळालं’, असं वक्तव्यही चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“बावनकुळेंचा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक”

MLC Election Result | “नाना पटोले यांच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली”

“अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव, पटोलेंनी राजीनामा द्यावा”

अकोला विधान परिषद निवडणूक: अकोल्यातही भाजपचा झेंडा, महाविकास आघाडीला मोठा धक्का

‘मी दिल्लीतच आहे, माझ्यावर कारवाई करा’; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More