ऑस्करसाठी ‘द काश्मीर फाईल्स’ ची निवड!

नवी दिल्ली | ऑस्कर (Oscar) पुुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि मोठा पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय दर्जोचा पुरस्कार आहे. याच पुरस्कारासाठी भारतातील एक महत्त्वाचा चित्रपट शॉर्टलिस्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.

2022 मध्ये चर्चेत आलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेला आहे. तसेच चित्रपटातील पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती(Mithun Charkavarty), दर्शन कुमार आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांना बेस्ट अॅक्टरसाठी नामांकन मिळालं आहे.

ही माहिती ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्विट करत दिली आहे. यामुळे या चित्रपटाशी जोडले गेलेले अभिनेता, अभिनेत्री आणि दर्शकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ शिवाय भारतातील हे चित्रपट देखील शाॅर्टलिस्ट झाले आहेत. आरआरआर (RRR),गंगुबाई काठीयावाडी (Gangubai Kathiawadi) आणि कांतारा (Kantara) हे चित्रपट बाकी 130 चित्रपटांसोबत स्पर्धा करतील.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More