‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं!

दुबई | इंग्लडच्या एका उगवत्या ताऱ्यानं अवघ्या 25 चेंडूत शतक झळकावण्याचा विक्रम रचल्याची बातमी येऊन धडकलीयं. विल जॅक्स नावाच्या भिडूने हा पराक्रम केला आहे.

दुबईत सुरु असलेल्या टी-10 तिरंगी मालिकेत इंग्लडचा सरे काउंटी क्रिकेट क्लब आणि लँकशायर क्रिकेट क्लब आमने सामने उभे ठाकले होते. या सामन्यातच ‘सरे’च्या विल जॅक्सनं तुफान फटकेबाजी केली. 

30 चेंडूत 105 धावांची खेळी करताना त्याने 11 षटकार आणि 8 चौकार लगावले. 25 चेंडूतच त्याने आपलं शतक साजरं केलं.

दरम्यान, प्रोफेशन क्रिकेटमध्ये इंग्लडच्या फलंदाजानं झळकावलेलं हे सर्वात वेगवान शतक मानलं जातयं. लँकशायरचा गोलंदाज स्टीफन पेरी याच्या एका ओव्हरमध्ये विल जॅक्सनं सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले. 

महत्वाच्या बातम्या-

-मी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य

-राष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

-मायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे

-मंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या

-“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”