बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक दे इंडिया ! भारतीय पुरूष हाॅकी संघाने रचला इतिहास; 49 वर्षानंतर उपांत्य फेरीत धडक

टोकियो | गेल्या काही दिवसांपासून जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू जीवाचं रान करून खेळत आहेत. परंतु भारताच्या पदरी निराशाच पडलेली दिसून येतीये. भारताच्या खात्यात आतापर्यंत केवळ दोनच पदकं पडली आहे. त्यातच आता भारतीय पुरूष हाॅकी संघाने भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

भारतीय पुरूष हाॅकी संघाने तब्बल 49 वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. रविवारी झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने ब्रिटनच्या संघाचा दारूण पराभव केला. भारतीय संघाने ब्रिटनच्या तगड्या संघाला 3-1 ने नमवलं. भारताने सुरूवातीपासून आक्रमक खेळी केली. पहिल्या मिनिटालाच भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याचा फायदा भारताला उचलता आला नाही. त्यानंतर मात्र भारताने आक्रमक खेळी केली.

सामन्याच्या 7 व्या मिनिटालाच दिलप्रीत सिंहने गोल करत भारताला पहिली आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने ब्रिटनला एकही संघी दिली नाही. त्यानंतर गुरजंत सिंहने दुसरा गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताने ब्रिटनला हातपाय हलवू दिले नाही आणि पहिलं सत्र आपल्या नावावर केलं.

दुसऱ्या सत्रात ब्रिटनने आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अनेकदा ब्रिटनला पॅनल्टी काॅर्नर मिळाले. मात्र भारतीय हाॅकी संघाचा वाॅल म्हणून ओळखला जाणारा गोलरक्षक पी आर श्रीजेश याने ब्रिटनला एकही गोल करू दिला नाही. 45 व्या मिनिटाला इयान वाॅर्डने पेनल्टी काॅर्नरवर गोल करत ब्रिटनला पहिला गोल मिळवून दिला. त्यानंतर भारतीय डिफेन्डरने चांगली खेळी करत अनेक गोल होऊ दिले नाही.

दरम्यान, 57 व्या मिनिटाला हार्दिक सिंहने आणखी एक गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. भारतीय संघाने अखेर पर्यंत जोरदार रक्षात्मक खेळी केली आणि अखेर भारताने दमदार विजय मिळला. या विजयाबरोबरच भारत तब्बल 49 वर्षानंतर ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी 1980 साली भारतीय हाॅकी संघाने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकवलं होतं.

थोडक्यात बातम्या-

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

“फक्त 15 रूपयात नवा सातबारा, आता जमिनीच्या खोट्या नोंदीही करता येणार नाही”

“सेना भवनापर्यंत स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल”

जीवाचं रान करून 16 कोटी जमवले, इंजेक्शनही दिलं पण….; चिमुकल्या वेदिकाची झुंज अपयशी

‘कोरोनाची तिसरी लाट अटळ पण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More