बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पक्षाला रामराम

पणजी | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्याशी देशात तिसऱ्या आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. अशातच आता ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे.

सध्या ममता बॅनर्जी गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत हातपाय पसरताना दिसत आहेत. तृणमुल काँग्रेस यंदा गोव्याच्या सर्वच्या सर्व 40 जागा लढवणार आहे. अशातच गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल अलेमाव (Churchill Alemao) यांना ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षात सामिल करून घेतलं आहे.

चर्चिल आलेमाओ यांनी आपला राजीनामा गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. चर्चिल आता ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये सामील होणार आहेत. चर्चिल आलेमाओ 2 आठवड्यांपूर्वी कोलकाता येथे गेले होते. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे मानले जात होतं.

दरम्यान, चर्चिल आलेमाओ यांनी 2014 मध्ये गोव्यातून टीएमसीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यामुळे त्यांनी आता चर्चिल आलेमाओ यांच्या फुटण्यानं राष्ट्रवादीला गोव्यात मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.

थोडक्यात बातम्या-

“एवढं तरी वाचायला हवं, इतकं बावळट असून चालत नाही”

टेंशन वाढलं! Omicron बाधित रूग्णाचा मृत्यू, खुद्द पंतप्रधानांनी केला खुलासा

अंकिता लोखंडेला आली सुशांतसिंह राजपूतची आठवण; साखरपुड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

मनसे-भाजप युती होणार का?, राज ठाकरे म्हणतात…

“मॅचपूर्वी SEX करा”, सचिन-द्रविडसह इतर खेळाडूंना मिळाला होता सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More