महेश मोतेवारने दगडूशेठला अर्पण केलेला ‘तो’ सव्वा किलो सोन्याचा हार ‘सीआयडी’च्या ताब्यात
पुणे | समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण केलेला सव्वा किलो सोन्याचा हार ‘सीआयडी’कडून जप्त करण्यात आला आहे. महेश मोतेवारने राज्यातील शेतकऱ्यांना शेळीपालन तसेच शेतीला पूरक व्यवसायातून आर्थिक फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखवून गंडा घातला होता.
महेश मोतेवारने आपल्या गुंतवणूकदारांना फसवून अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. सध्या त्याच्या गुन्ह्याचा तपास ‘सीआयडी’च्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात असून त्याच्या गुंतवणुकीची माहिती घेणं सुरू आहे.
तपासादरम्यान ‘सीआयडी’च्या अधिकाऱ्यांना एक फोटो सापडला ज्यामध्ये महेश मोतेवारने दगडूशेठ हलवाई गणपतीला सोन्याचा हार अर्पण केल्याचं स्पष्ट दिसत आहे. ‘सीआयडी’चे अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टशी संपर्क साधून तो हार आपल्या ताब्यात घेतला आहे.
शेतकऱ्यांची आणि सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करून त्यांच्या पैशाने सोन्याचा हार दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण केल्याचं अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं. त्या सोन्याच्या सव्वा किलो सोन्याच्या हाराची आताची किंमत तब्बल 60 लाख रुपये एवढी आहे. सध्या महेश मोतेवारची रवानगी ओरिसा कारागृहात केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
थोडक्यात बातम्या
सचिन वाझेंच्या मर्सिडीज गाडीत सापडलं नोटा मोजण्याचं मशीन आणि…
MPSC ची तारीख तर ठरली पण…; विद्यार्थ्यांसमोर आणखी नवा पेच
माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आईची आठवण आल्याने केली भावनिक कविता शेअर!
बटलरची खेळी विराटवर भारी; दणदणीत विजयासह इंग्लंड मालिकेत आघाडीवर
Comments are closed.