वाल्मिक कराडची धमकी त्यानंतर सुदर्शन घुलेचा फोन…; CID च्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

Santosh Deshmukh case

Santosh Deshmukh case l संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात CID च्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ७ तारखेला सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यात झालेल्या फोन संभाषणात कराडने स्पष्ट शब्दांत धमकी दिली होती. “जो कोणी आपल्या आड येईल, त्याला आपण सोडणार नाही,” असे कराडने घुलेला सांगितल्याचे CID च्या चौकशीत समोर आले आहे.

तिरंगा हॉटेलमध्ये कट आखला गेला? :

CID च्या तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, ७ तारखेला वाल्मिक कराडशी बोलल्यानंतर सुदर्शन घुलेने थेट अवादा (Avada) कंपनीच्या कार्यालयात कॉल करून धमकी दिली होती. त्यानंतर, ८ तारखेला नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे (Vishnu Chate) आणि एक गोपनीय साक्षीदार यांची भेट झाली.

या बैठकीत विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा विशेष निरोप दिला होता. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट याच बैठकीत आखला गेला असावा, असा CID चा संशय आहे.

आरोपपत्रामुळे आरोपींवर कारवाईची शक्यता :

या प्रकरणात CID कडे असलेल्या फोन रेकॉर्डिंग, धमकीचे पुरावे आणि हॉटेलमधील भेटीच्या नोंदी हे सर्व आता आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. या पुराव्यांमुळे हत्येपूर्वीचा कट पूर्णपणे उघड झाला असून, आरोपींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

या नव्या खुलाशानंतर CID तपास अधिक गंभीर वळण घेत असून, न्यायालयात हे सर्व पुरावे सादर केल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे.

NewsTitle: CID Reveals Murder Plot in Santosh Deshmukh Case

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .