CIDCO ची घरे झाली स्वस्त, नवी मुंबईसाठी ‘या’ तारखेला निघणार लॉटरी

cidco house | नवी मुंबईमध्ये घर घेण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे.  2 ऑक्टोबरला सिडकोच्या (Cidco) घरांची जाहिरात निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा लोकांना थेट पैसे भरून घर बुक करता येणार आहे. यावेळी लॅाटरी पद्धतीने घरे विकली जाणार नाहीत. त्यातच म्हाडानंतर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. (cidco house)

सिडकोच्या घराच्या किंमतीत 10 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे घरांची किंमत थेट पाच ते सहा लाखांनी कमी होणार असल्याचं म्हटलं जातंय. सध्या असलेल्या किंमतीमध्ये 10 टक्यांची कपात करण्याचा निर्णय सिडकोच्या बोर्ड मिटींगमध्ये घेण्यात आला आहे.

सिडकोच्या घरांच्या किंमतीत कपात

यासोबतच पंतप्रधान आवास योजनेचाही अडीच लाखाचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे आता थेट 5 ते 6 लाख रूपयांनी घरांच्या किंमती कमी होतील. 47 हजार घरांपैकी 25 हजार घरांची जाहिरात महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने येत्या 2 ॲाक्टोबर काढली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार आहे. यामुळे मुंबई तसेच मुंबई उपनगरात राहणाऱ्यांना परवडणारी घरे घेण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. (cidco house)

‘या’ घरांसाठी निघणार लॉटरी

वाशी, सानपाडा, जुईनगर, खांनेदेश्वर , नेरूळ या ठिकाणी सिडकोने घरे बांधली आहेत. सध्या 67 हजार घरांचे काम सुरू असून 40 हजार घरांचे काम पूर्ण झाले आहे. घरांबरोबर सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आणले आहे. एक रनवे पूर्ण झाला असून दुसऱ्याचे काम सुरू आहे. (cidco house)

News Title :  cidco house price cut

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यावर परतीच्या पावसापूर्वी मोठं संकट, IMD ने दिला महत्वाचा इशारा

मोठी बातमी! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

आज संकष्टी चतुर्थीला बाप्पा ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न!

जरांगे पाटलांची प्रकृती खुपचं ढासळली; सरकार काय पाऊल उचलणार?

घरच्या घरी बनवा ‘हा’ फेसवॉश; आठ दिवसात मिळेल कोरियन ग्लास स्कीन