मुंबईत स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी, आजच करा अर्ज

Cidco Lottery 2024 l नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडकोने नवी मुंबईत तब्बल 902 घरांसाठी लॉटरी काढली आहे. ज्यासाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे नागरिक मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहतायेत ते नागरिक CIDCO lottery.cidcoindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु :

जर तुम्हालाही सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत घर हवं असल्यास तुम्ही आजपासून म्हणजेच 27 ऑगस्टच्या दुपारी 12 वाजल्यापासून अर्ज करू शकतात. मात्र ही अर्ज प्रक्रिया 26 सप्टेंबरपर्यंतच सुरू राहणार आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रियेच्यानंतर लॉटरीसाठी संगणक सोडत 10 ऑक्टोबर 2024 रोजी निश्चित करण्यात आली आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खुला प्रवर्ग आणि मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. ज्यामध्ये कळंबोली, खारघर आणि घणसोलीमध्ये एकूण 213 घरे आहेत. त्यापैकी 175 घरे सर्वसाधारण वर्गासाठी तर 38 घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहेत. तसेच खारघरमध्ये सिडकोचे स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार उत्सव प्रकल्पही आहेत. त्यामध्ये 689 घरे उपलब्ध आहेत.

Cidco Lottery 2024 l या घरांची किंमत किती असणार? :

– खारघरमध्ये ईडब्ल्यूएससाठी 31 घरे असून त्यांची सर्वसाधारण किंमत 26 लाख 49 हजार 718 रुपये आहे. तसेच कळंबोलीत ईडब्ल्यूएससाठी 6 घरे असून त्यांची सर्वसाधारण किंमत 26 लाख 32 हजार 368 रुपये आहे. याशिवाय घणसोलीत ईडब्ल्यूएससाठी 1 घर असून त्याची सर्वसाधारण किंमत 26 लाख 9 हजार 420 रुपये आहे.

खारघरमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 143 घरे आहेत. त्या घरांची किंमत 37 लाख 95 हजार 173 रुपये आहे. कळंबोलीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 31 घरे आहेत. या घरांची किंमत 37 लाख 47 हजार 159 रुपये आहे. तर घणसोलीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 31 घरे असून या घरांची सर्वसाधारण किंमत 36 लाख 72 हजार 505 रुपये आहे.

खारघरमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी 10 घरांची किंमत 66 लाख रुपये:

खारघर सेलिब्रेशनमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी 10 घरे आहेत. या घरांची किंमत 66 लाख रुपये आहे. तर उच्च उत्पन्न गटासाठी 23 घरे आहेत. घरांची किंमत 1 कोटी 13 लाख 93 हजार रुपये आहे. तसेच स्वप्नपूर्तीच्या प्रकल्पात EWS साठी 42 घरे आहेत. या घरांची किंमत 37 लाख रुपये आहे. तर, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 359 घरे आहेत. ज्यांच्या घरांची किंमत 46 लाख 48 हजार आहे.

याशिवाय व्हॅली क्राफ्टमध्ये उच्च उत्पन्न गटासाठी 136 फ्लॅट्स आहेत. येथील एका घराची किंमत 2 कोटी 5 लाख 5 हजार रुपये आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी 118 घरे उपलब्ध आहेत. ज्या घरांची एका घराची किंमत 1 कोटी 7 लाख 26 हजार रुपये आहे.

News Title : Cidco Lottery 2024

महत्त्वाच्या बातम्या-

कार वापरणाऱ्यांनो सावधान!; कारचा AC ठरतोय यमराज, दोघांचा मृत्यू

जो पाठीराखा त्याच्यावरच गेम केलास!; डीपी दादाला नॅामिनेट केल्याने अंकितावर भडकली

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा आणि कोट्यधीश व्हा!

पोकळ नेते उघडे पडतातच!; शिवरायांचा पुतळा कोसळ्याने किरण माने संतापले

श्रीकृष्णाची पूजा करताना अंकिता लोखंडेकडून चूक, नेटकरी भडकले!