मुंबई | मराठीतील हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या नुकत्याच यशस्वी ठरलेल्या हिरकणी सिनेमातील अभिनयामुळे चांगलीच चर्चेत होती. ऐतिहासिक भूमिका निभावल्यानंतर तिला आता आणखी एक असाच ऐतिहासिक चित्रपट मिळाला आहे. छत्रपती ताराराणी असं या चित्रपटाचं नाव आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी ताराबाई यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे.
नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अर्थातच सोनाली कुलकर्णी या चित्रपटात महाराणी ताराराणी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा पोस्टर यासंदर्भात अधिक बोलका आहे. घोड्यावर बसलेल्या आक्रमक ताराराणींच्या भूमिकेत सोनालीला दाखवण्यात आलं आहे.
प्रसिद्ध लेखक जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या पुस्तकावर आधारित हा सिनेमा असणार आहे. राहुल जनार्दन जाधव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अवधूत गुप्तेचं संगीत तर कथा, पटकथा, संवाद डॉ. सुधीर निकम लिहिणार आहेत.
छत्रपती ताराराणींचं प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचं भाग्य लाभणं म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणी विषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलं नाही, तिच्या कर्तुत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानात्मक काम असेल, या जबाबदारीची जाणिवही मला आहे. महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं बास हीच प्रार्थना, असं सोनालीनं म्हटलं आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
विजय मल्ल्याचा बंगला खरेदी करणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्याला ईडीनं केली अटक
बेफिकिरी नडणार! डिसेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णसंख्येत एवढी वाढ
भारतासह ‘या’ दोन देशांमध्येही भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा
न्यायव्यवस्था खरंच जीर्ण झालीय का?; शरद पवार म्हणतात…
शेतकरी आंदोलन: देशात असंतोष पसरवण्याचा आरोप, 21 वर्षीय दिशा रवीला अटक
Comments are closed.