बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

पुणे | सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, समाज अभ्यासक आणि निर्मात्या सुमित्रा भावे यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्या आजारी असल्याचं कळतंय.

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासोबतीनं अनेक उत्कृष्ट मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी 1995 मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट चांगलेच गाजले. ‘दिठी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही.

त्यांचे अनेक सिनेमे आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजले. तर बऱ्याच चित्रपटांना राज्य शासन आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांच्या ‘बाई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कुटुंबकल्याण चित्रपट, ‘पाणी’ हा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट, ‘वास्तुपुरुष’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, ‘कासव’ सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले आहेत.

दरम्यान, सुमित्रा भावे यांचा जन्म 12 जानेवारी 1943 मध्ये पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळवल्यानंतर पुढे, पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये मोबदल्याविना काम केलं. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथे मराठी भाषेच्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केलं आहे. त्या अपघातानंच लघुपटाकडं वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमानं कार्यरत होत्या. त्यांच्या जाण्यानं मात्र पुण्यातील, तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर शोककळा पसरली आहे.

थोडक्यात बातम्या

“…तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील”

“कोरोना काळात राजकारण करू नका पण, उद्धवजी हे ऐकतील का?”

“या उपटसोंड्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार?”

‘या’ सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

तोंडात कोरोनाचे जंतू टाकतो म्हणणाऱ्या शिवसेना आमदाराला फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More