बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागरिकांनो सावधान! देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढतोय

नवी दिल्ली | देशात गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच गेल्या काही आठवड्यांमध्ये देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ लागली आहे.

गुरुवारी देशात 35 हजार 342 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होऊ लागल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर 38 हजार 750 नवे कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

गुरुवारी देशभरात 483 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 4 लाख 19 हजार 470 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. देशभरात सध्या 4 लाख 5 हजार 513 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आज देशात 54 लाख 76 हजार 423 नागरिकांना लस देण्यात आली आहे. तसेच भारतात आत्तापर्यंत 42 कोटी 34 लाख 17 हजार 30 नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“न्यूड ऑडिशनला नकार दिल्यानं मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती”

ब्रेकिंग! पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पेट्रोल, डिझेल न देण्याचा निर्णय

कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगलीतील ‘या’ गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा!

इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

ह्रदयद्रावक! पुराचं पाणी शिरल्याने चिपळूणच्या कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More