बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागरिकांनो सावधान! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्याही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूने डोकं वर काढलं असतानाच बुधवारी देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं.

देशभरात काल 48 हजार 786 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळूहळू कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत असतानाच आता रूग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर काल 61 हजार 588 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक रुग्ण वाढल्याच पाहायला मिळत आहे. काल देशभरात 1 हजार 5 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 99 हजार 459 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 05 लाख 23 हजार 257 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 3 कोटी 4 लाख 11 हजार 634 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 33 कोटींहुन अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. तसेच लसीकरणात जागतिक पातळीवर भारताने विक्रम नोंदविला आहे आणि देशातील सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात करण्यात आल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं दाखल केलेली पूनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

‘गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचा पडळकरांना पाठींबा

गोपीचंद वि. राष्ट्रवादी संघर्ष पेटला??; गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं

मोठी बातमी! नाना पटोलेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खळबळजनक पत्र

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More