बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काबूल हल्ल्यात भारतीय कनेक्शन?; आली ही धक्कादायक माहिती समोर

काबूल | काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ खोरोसन प्रॉव्हन्स या दहशतवादी गटाने घेतली होती. या बॉम्बस्फोटात 170 नागरिकांनासह 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यातच आता बॉम्बस्फोट घडवून आणलेल्या दहशतवादी गटामध्ये केरळमधल्या 14 जणांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.धक्कादायक! काबूल विमानतळावर केलेल्या इसिस दहशतवादी गटात केरळच्या नागरिकांचा समावेश

2014 साली सिरीया आणि लेव्हंटने उत्तर इराकमधल्या मोसुल शहरावर कब्जा केला. तेव्हा केरळमधल्या मलप्पुरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यातील काही नागरिकांनी देश सोडत पश्चिम आशियातल्या जिहादी गटात प्रवेश केला होता. त्यातील काही लोक अफगाणिस्तानतल्या नानगरहर प्रांतात आली होती. त्यावेळी तालिबानने त्यांना अटक केली.

आता अफगाणिस्तामध्ये तालिबानने पुन्हा वर्चस्व मिळवल्यानंतर आता त्यातील 14 नागरिकांना बागराम तुंरूगातून सोडून देण्यात आलं. सहभागी असलेल्या केरळच्या एका नागरिकाने त्याच्या घरी संपर्क साधला होता. मात्र, अन्य 13 जण इसिसच्या दहशतवादी गटासोबतच अद्याप काबूलमध्ये होते. त्यानंतर काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटात या 13 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर केरळ मधील नागरिकांचा वापर करून दहशतवादीशी भारताचा संबंध जोडून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा अन्य देश प्रयत्न करतील, अशी चिंता आता भारताला सतावत आहे. या घटनेबाबत हिंदूस्थान टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आता स्वस्त किंमतीत सोन्यात गुंतवणूक करा; केंद्र सरकारची मोठी योजना

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारूण पराभव; इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेर

‘…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानचं अफगाणी नागरिकांना नवं फर्मान

जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू – निलेश राणे

राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल कोल्हेंनी घेतला समाचार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More