कमी बजेटमध्ये लाँच झाली ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत

New Car l भारतीय बाजारपेठेत Citroen Basalt SUV Coupe ही कार लाँच झाली आहे. Citroen ने ही नवीन SUV बाजारात आणली आहे ज्याची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे. Citroen Basalt ची ही कार 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत जे लोक बुक करतील त्यांनाच या किमतीत ही कार मिळणार उपलब्ध असेल. या तारखेनंतर या कारची किंमत बदलली जाण्याची शक्यता आहे.

नवीन SUV C3 Aircross वर आधारित :

Citroen Basalt ही 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असणार आहे. या कारचे इंजिन 82 bhp पॉवरदेण्यास सक्षम असणार आहे. या इंजिनला 5-स्पीड गिअर बॉक्स बसवण्यात आला आहे. त्याचे टॉप-एंड मॉडेल 1.2-लिटर टर्बो युनिट इंजिनसह सुसज्ज असेल, जे 110 bhp पॉवर जनरेट करेल. या इंजिनसोबत 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर जोडले गेले आहे.

Citroen Basalt ही कार C3 Aircross वर आधारित आहे. या कारचे डिझाइन आणि लूक ही तिची ओळख आहे. या वाहनात बसवलेले 2-पार्ट ग्रिल त्याच्या डिझाइनला एक आकर्षक लुक देत आहे. या कारमध्ये नवीन एलईडी प्रोजेक्टर वापरण्यात आला आहे. या नवीन SUV मध्ये 16-इंच अलॉय व्हील्स देखील आहेत.

New Car l फीचर्स काय असणार? :

नवीन SUV चे इंटीरियर देखील C3 Aircross प्रमाणे ठेवण्यात आले आहे, जे Citroën च्या संपूर्ण रेंजमध्ये दिसते. या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसह प्रीमियम सेंटर कन्सोल आहे. या कारला फ्रंट आर्मरेस्ट आणि मोठी टचस्क्रीन देखील देण्यात आली आहे. यासोबतच कारमध्ये नवीन रियर हेडरेस्टही देण्यात आले आहेत.

Citroen च्या या नवीन SUV मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन आणि 7-इंचाचा डिजिटल डिस्प्ले असणार आहे. यासोबतच वायरलेस चार्जिंग, रियर कॅमेरा आणि 6 एअरबॅग्जची सुविधाही या नव्या एसयूव्हीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या कारला 470 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. या सिट्रोएन वाहनात कूल्ड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ADAS सारखी वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली नाहीत.

News Title :  Citroen Basalt SUV Coupe Launched

महत्त्वाच्या बातम्या-

सोने-चांदीचा ग्राहकांना झटका; काय आहेत आजचे दर

‘या’ 3 मोठ्या बँकांचा ग्राहकांना झटका; व्याजदरात केली वाढ

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज सुरू, 2030 घरांची विक्री होणार, जाणून घ्या सर्व काही

राजकीय घडामोडींना वेग! बच्चू कडू शरद पवारांच्या भेटीला, महायुतीला देणार धक्का?

…म्हणून ‘या’ दिवशी अहमदनगरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!