मुंबई | गुरुवारी रात्री मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलला आग लागली होती. या आगीमध्ये मॉलचे दोन मजले पूर्णपणे जळून खाक झालेत. दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी घटनास्थळी भेट दिलीये.
आग लागलेल्या सिटी सेंटर मॉलला आदित्य ठाकरे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यासंदर्भात ते स्ततः माहिती घेतल असल्याचं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे.
सिटी सेंटर मॉलमध्ये आगीची घटना घडली होती, सदर घटनास्थळी नुकतीच भेट दिली. या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोट या आधुनिक तंत्रज्ञानासह आग विझविण्यासाठी यशस्वीपणे कार्य केले. pic.twitter.com/A9BvtnzpPk
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 23, 2020
आदित्य ठाकरे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “सिटी सेंटर मॉलमध्ये आगीची घटना घडली होती. सदर घटनास्थळी नुकतीच भेट दिली असून या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोट या आधुनिक तंत्रज्ञानासह आग विझविण्यासाठी यशस्वीपणे कार्य केले.”
मॉलला लागलेली आग ही लेवल 5 ची होती. या मॉलच्या शेजारी 55 मजल्यांची मोठी इमारत होती. या इमारतीतील तब्बल तब्बल 3500 रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या आमदाराकडून राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
नितिशकुमारांच्या योजनेमुळे बिहारमधील कोरोनाचा प्रादुर्भाव टळला- नरेंद्र मोदी
धूम स्टाईलप्रमाणे खासदार उदयनराजेंनी मारला बाईकने फेरफटका!
वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न होतोय- कंगणा राणावत