बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सीटी ऑफ ड्रीम्स 2’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, पाहा व्हिडीओ!

मुंबई | गेल्या वर्षी चर्चेत राहिलेल्या वेब सिरिजपैकी एक म्हणजे ‘सीटी ऑफ ड्रीम्स’. या वेबसिरिजमधून प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर आणि अतुल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना वेड लावलं. आता ते पुन्हा नव्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या वेब सीरिजचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्याचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘सीटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन तुफान गाजल्यानंतर आता दुसऱ्या सीझनचा जोरदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. डिझनी प्लस हाॅटस्टारनं आपल्या अधिकृत अकांऊंटवरून हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

‘सीटी ऑफ ड्रीम्स’च्या पहिल्या सीझननं जबरदस्त अभिनय, राजकीय घराणं, त्या कुटुंबातील दोन राजकीय वारसदार आणि त्यांच्यामधील राजकीय चढाओढ या संघर्षानं अनेकांची मन जिंकली. आता दुसऱ्या सीजनमध्ये मुलगी आणि वडिलांमध्ये सत्तेचा खेळ कसा रंगतो? हे दाखवण्यात येणार आहे. सत्तेसाठी बाप-लेक कोणत्या थराला जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘सिटी ऑफ ड्रिम्स 2’ सीरिज 30 जुलैला हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. आता पहिल्या सीझनला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसरा सीझन कितपत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

 

थोडक्यात बातम्या – 

‘कोरोना जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत जेवणार नाही’; मंत्र्यानं केला मोठा निश्चय

‘देशात ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागला ‘; गडकरींचा व्हिडीओ व्हायरल

“राज्याचे प्रश्न कोमात अन् स्वबळाची छमछम जोरात”

“दादा… दोन हाना पण मला आपलं म्हणा, आता माफ करुन अबोला सोडावा”

…म्हणून इलेक्ट्रीक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More