बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नगरच्या तरुणाची औरंगाबादमध्ये निर्घृण हत्या, हाताविना आढळला मृतदेह

औरंगाबाद | राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. परिक्षेसाठी औरंगाबादमध्ये आलेल्या एका 23 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह हात नसलेल्या स्थितीत आढळला.

विकास देवीचंद चव्हाण असं या मुलाचं नाव असून अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये तो राहत होता. 23 वर्षाचा विकास अहमदनगरच्या पार्थर्डीतून औरंगाबादला गेला होता. त्याची औरंगाबादला बँकेची परिक्षा होती. सकाळी आठ वाजेच्या सुमारास या तरुणाची परीक्षा होती. मात्र याआधीच त्याची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह एका कब्रस्तानात सापडला.

सकाळी 8 च्या सुमारास विकासचा मृतदेह स्थानिकांना सापडला. आरोपींनी तीक्ष्ण हत्यारानं हत्या करुन मृतदेह कब्रस्तानात फेकून दिला होता. विकासचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या मृतदेहाला हात नव्हते. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पोलिसांना विकासच्या खिश्यात एसटीचं तिकिट सापडलं. एसटीच्या तिकिटावरुन मृतदेहची ओळख पटली. त्यावरून पोलिसांना मृतव्यक्तीची ओळख पटली. पोलिसांनी त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा आधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

लस संपली! मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र पुरवठ्याअभावी बंद

‘त्या’ प्रकरणात माझीही चौकशी करा; अजित पवारांचं खुलं आव्हान

धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, मुलगी मात्र सुखरुप

पुढील 4 ते 5 दिवसात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More