बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ लस कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा दावा

नवी दिल्ली | कोव्हॅक्सीन लस कोविड-19 च्या अल्फा, डेल्टा या दोन्ही व्हेरिअंटवर प्रभावी असल्याचा दावा अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं केला आहे. कोव्हॅक्सीन सर्व व्हेरिअंटवर प्रभावी असल्याचं अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं म्हटलंय.

कोव्हॅक्सीनचा डोस घेतलेल्या दोन नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिअंटविरोधात लढण्यासाठीच्या अँटीबॉडी आढळून आल्या आहेत, असं अमेरिकेच्या आरोग्य संस्थेकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे कोव्हॅक्सीन कोरोनावर प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे.

भारत बायोटेक कंपनीनं विकसीत केलेली कोव्हॅक्सीन लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिअंटला प्रभावीपणे नष्ट करत असल्याचं दिसून आलं आहे, असं अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं म्हटलंय.

दरम्यान, कोव्हॅक्सीन लसीचं अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं कौतुक केलं आहे. यानंतर कोव्हॅक्सीन लसीच्या परिणामकारकतेवर संशय व्यक्त करणाऱ्या चर्चांना यातून पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

“ज्या पवारांनी त्यांची जात काढली, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागतायत”

‘केंद्राच्या परवानगीनंतरच सगळी कामं करता का?’; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापलं

महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘हे’ नवीन नाव चर्चेत

‘4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास…’; स्टेट बॅंकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी

‘…सरकार शहाणं झालं म्हणा’; ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारचं कौतुक अन् टोमणे एकाचवेळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More