बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं केल्याचा दावा, डॅाक्टरवर गुन्हा दाखल

मुंबई | कोरोनाने सगळीकडे थैमान घातलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोना झाल्यावर 15 दिवसांनी त्याची प्राथमिक लक्षणे दिसतात त्यानंतर माणसाच्या अंगात त्याचे विषाणू पसरतात. त्यामुळे कोरोनातून बरं होण्यासाठी जवळजवळ 15 दिवस तरी क्वारंटाईन रहाव लागतं. तेव्हाकुठे कोरोनातून आपण सावरतो मात्र अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळ असलेल्या वांगणीमधील खाजगी दवाखान्यातील डॉ. उमाशंकर गुप्ता यांनी अजब दावा केला आहे.

डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्याच्या महिला सहकारी डॉक्टर यांनी आपण एका दिवसात कोरोनाबाधित रूग्ण बरा केल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्या दवाखान्यातील गर्दी ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. मात्र या प्रकरणाची आरोग्य विभागाने दखल घेतली.

डॉ गुप्ता यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग ठाणे यांची कोणतीही परवानगी नसताना वांगणी येथे आपले क्लिनीक सुरू ठेवलं होतं. कोरोना काळात कोणतेही नियम न पाळता, मास्क न लावता, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेत नसल्याचा ठपका ठेवत डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अंबरनाथचे डॉ. सुनील बनसोडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, डॉ. उमाशंकर गुप्ता यांच्यावर जरी गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना अटक केली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. नागरिकांनी अशा डॉक्टरांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण अजुनही कोरोनावर मात करणारं औषध सापडलं नाही. त्यामुळे सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करा आणि काही लक्षणे आढळल्यास चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या.

थोडक्यात बातम्या-  

‘हिन्दुस्तानी भाऊ’ला पोलिसांनी घेतलं ताब्यात, जाणून घ्या कारण; पाहा व्हिडीओ

‘स्वामी…स्वामी..स्वामी…’म्हणत अंकिता लोखंडेने घेतली कोरोनाची लस, व्हिडीओ होतोय व्हायरल

जनतेवर ‘माझा जीव माझीच जबाबदारी’ म्हणण्याची वेळ आली- राधाकृष्ण विखे पाटील

प्रेयसीचा गळा चिरुन खून, हळदीला बसलेल्या तरुणाला अटक, हत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर

आनंदाची बातमी! कोरोनावर आणखी एका औषधाला मंजुरी, ऑक्सिजनची गरज होणार कमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More