बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनावर प्रभावी औषध शोधल्याचा दावा, महाराष्ट्रातील सांगलीत उत्पादन सुरु

सांगली | संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यातच लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. परंतु कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सांगली येथील आयसेरा बायोलॉजी या कंपनीने कोरोनावर प्रभावी अशा इंजेक्शनची निर्मिती केल्याचा दावा केला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील आयसेरा बायोलॉजी कंपनीने म्हटल्याप्रमाणे, त्यांनी अँटीकोव्हिड या इंजेक्शनची निर्मिती केली असून त्यांनी प्राण्यांवरील चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तसेच आता मानवी शरीरावर चाचणी करण्यासाठी आयसीएमआरकडे परवानगी मागितली आहे.

दरम्यान, आतापर्यंत या इंजेक्शनच्या सर्व प्रक्रिया आणि चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा या कंपनीने केला आहे. जर या इंजेक्शनला आयसीएमआरने परवानगी दिली, तर हे कोरोनावर संजीवनी ठरू शकते, अशा प्रकारे कंपनीने म्हटलं आहे. आयसेरा बायोलॉजी ही कंपनी कोविशिल्ड लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीसोबत रेबीज, सर्पदंश अशा रोगांवरील औषधांचं निर्माण करते.

केंद्राने जर या लसीला परवानगी दिली, तर महिन्याला 9 लाख डोस तयार करण्याची तयारी असल्याचं या कंपनीने बोलून दाखवलं आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले ‘अँटीकोविड सिरम’ लसीचे 3 लाख डोस सध्या तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, आता कंपनीने दावा केल्याप्रमाणे या औषधावर आयसीएमआर नेमकं काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण येत्या काही दिवसात परवानग्या पूर्ण होऊन हे इंजेक्शन लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या

“पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला महिन्याला 29 कोटी डोस देणार”

क्वारंटाईन संपलेल्या आजोबांना आणायला गेले नातेवाईक, समोर आला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’; गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात

उत्तराखंडात पुन्हा ढगफुटी; घर, दुकानं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More