बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त, अदानी म्हणाले…

गांधीनगर | गौतम अदानी हे नाव भारतीय व्यावसायीक जगतात सुप्रसिद्ध आहे. गौतम अदानी समुह सध्या देशातील विविध सार्वजनिक गोष्टींमध्ये गुतवणूक करत आहे. भारत सरकारच्या खाजगीकरणाचा मोठा भाग हा अदानी समुहाकडून विकत घेण्यात आला आहे. अदानी समुह सध्या हेराॅईन जप्तीच्या प्रकरणी वादात अडकलं आहे.

जगातील सर्वात मोठी ड्रग्ज जप्तीची कार्यवाही ही भारतात झाली आहे. गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जवळपास 3 हजार किलो हेराॅईन जप्त करण्यात आलं आहे. मुंद्रा पोर्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सध्या गौतम अदानी समुह सांभाळत आहे. जवळपास 20 हजार कोटी रूपये किंमतीच्या या ड्रग्ज प्रकरणी अदानी समुहाकडून एक पत्रक काढून स्पष्टीकरण करण्यात आलं आहे.

अदानी समुहानं म्हटलं की, 16 सप्टेंबर रोजी डीआरआय आणि कस्टम्स विभागाने अफगाणिस्तानातून आलेल्या दोन कंटेनरमधून मुंद्रा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर मोठ्या प्रमाणावर हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला. अवैध, अंमली पदार्थांचा साठा आणि आरोपींची धरपकड केल्याप्रकरणी आम्ही डीआरआयचे अभिनंदन करतो, असं या पत्रात म्हटलं आहे.

डीआरआय आणि कस्टम्स विभागाला सरकारने बेकायदेशीर कार्गो उघडून तपासणी करण्याचे अधिकारी दिले आहेत. मात्र देशभरातील कुठलाही पोर्ट ऑपरेटर कंटेनरची तपासणी करु शकत नाही, असं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. सर्व स्तरातून अदानी समुहाची बदनामी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या 

‘…अन् महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कॅप्टन झाला’; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

“…त्यामुळे आता संजय राऊतांनी राजकारण सोडावं”

पंजाबने हातातला सामना गमावला, राजस्थानचा रोमांचक विजय

कोरोना संदर्भात देशासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर!

भारतात दिल्या जाणाऱ्या ‘या’ लसीला ब्रिटनकडून मान्यता नाहीच!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More