बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचं सीरम?; भारत बायोटेक अन् केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली | कोवॅक्सिन लशीसाठी गायीच्या वासराच्या सीरमचा वापर करण्यात आला, अशी पोस्ट काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी केली. यानंतर एकच खळबळ उडाली. या लशीसाठी 20 दिवसांपेक्षाही लहान गायीच्या वासराच्या सीरमचा वापर करण्यात आल्याचा दावा केला आणि सरकारने याबाबत आधी माहिती का दिली नाही, असा सवाल गौरव पांधी यांनी उपस्थित केला.

आरटीआयमध्ये दिलेल्या उत्तरात मोदी सरकारने मानलं आहे की कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराच्या सीरमचा वापर होतो. यामध्ये 20 दिवसांपेक्षा कमी वयाच्या वासराला मारून त्याचा वापर होतो. हा गुन्हा आहे. ही माहिती सर्वांसमोर आधीच यायला हवी होती, असं गौरव पांधी म्हणाले.गौरव पांधी यांनी केलेल्या या दाव्यावर आता भारत बायोटेक आणि केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

लस निर्मितीत व्हिरो सेल तयार करण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी वासराच्या सीरमचा वापर झाला आहे. मात्र लशीच्या शेवटच्या फॉर्म्युल्यात वासराच्या सीरमचा वापर होत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिल्याचं कळतंय.

दरम्यान, ही लस पूर्णपणे शुद्ध आहे. त्यातील सर्व अशुद्धता हटवण्यात आली आहे. लस निर्मितीसाठी वासराच्या सीरमचा वापर कित्येक दशकांपासून जगभरात होतो आहे. गेल्या नऊ महिन्यांत याबाबत सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर माहिती देण्यात आली आहे, असं भारत बायोटेकने सांगितल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे?”

“सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच”

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

‘कोरोनाच्या संकटातही मैदानात उतरण्यासाठी आतूर’; फिक्सिंगमध्ये सापडलेल्या ‘या’ खेळाडूवरील बंदी बीसीसीआयने हटवली

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More